देश

‘बिगर मुस्लीमांच्या नावाने रस्त्यांचं नामकरण व्हायला हवं’; भाजप खासदाराची मागणी

बंगळुरू | मुस्लीम बहूल भागांत बिगर मुस्लीम महापुरुषांच्या नावावर विचार करावा. देशात बिगर मुस्लीम महापुरुष आणि राष्‍ट्रभक्तांची कमी नाही आणि त्यांच्याच नावाने रस्त्यांचे नामकरण व्हायला हवं, असा सल्ला भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी बेंगळुरू महापालिकेला दिला आहे.

एका कन्नड वृत्तपत्रत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर दक्षिण बेगळुरूचे खासदार तेजस्वी यांनी बृहत बेंगळुरू महानगरपालिकेचे आयुक्त एन मंजूनाथ प्रसाद यांना पत्र लिहिलं आहे.

बिगर मुस्लीमांच्या नावाने रस्त्यांचे नामकरण व्हायला हवं, असं तेजस्वी सूर्या यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच बीबीएमपीने केवळ मुस्लीम नावेच सुचवली आहेत, असंही ते म्हणाले.

मुस्लीम बहूल भागांत रस्त्यांचे नामकरण मुस्लिमांच्या नावाने करणे, हा द्विराष्ट्र सिद्धांतासारखा विचार आहे. ज्या प्रकारे मुस्लीम लीगने हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळ्या मतदार याद्यांची मागणी केली होती, अगदी त्याच प्रकारचा हा सांप्रदायिक विचार आहे. या निर्णयावर आयुक्तांनी पुनर्विचार करावा, असं तेजस्वी सूर्या यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

कोल्हापूर महापालिका निवडणूक भाजप पूर्ण ताकदीनिशी लढणार- चंद्रकांत पाटील

कोरेगाव भीमाला जाणारच, प्रसंगी न्यायालयात जाऊ- चंद्रशेखर आझाद

समुद्रातील कार जेसीबीनं बाहेर काढली; वाचा नेमकं काय घडलं होतं

‘….तोपर्यंत नव्या वर्षांचं सेलिब्रेशन नाही’; आंदोलक शेतकरी आक्रमक

पीडित मुलीला न्याय देणार का पवार साहेब?’; मेहबूब शेख यांच्या प्रकरणावरून राणेंचा थेट पवारांना सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या