कार्यालयीन वेळासंदर्भात मुख्यमंत्र्यांची थेट पंतप्रधानांकडे मागणी
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कार्यालयीन वेळासंदर्भातील पारंपारिक पद्धतीऐवजी धोरण अमलात आणण्यासंदर्भातील विचार करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नीती आयोगाच्या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी हा मुद्धा मांडला.
नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीमध्ये कोरोना लाॅकडाऊनबरोबरच देशभरातील महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. यावेळेस आपली भूमिका स्पष्ट करताना उद्धव ठाकरेंनी, कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नसल्याचं सांगितलं. कार्यालयीन वेळांच्या बाबतीत आपली 10 ते 5 ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. यासाठी कार्यालयीन वेळांचे नियोजन करण्याची गरज असून त्याबद्दल केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या बैठकीमध्ये कोरोना काळामध्ये महाराष्ट्राने कशाप्रकारे वाटचाल केली याबद्दल बोलताना उद्धव यांनी, “राज्य शासनाची भूमिका कल करे सो आज कर, आज करे सो अभी अशी आहे,” असं म्हटलं आहे. तसेच कोरोना कालावधीमध्येही राज्याचा विकास थांबला नाही. राज्यावरील कोरोना संकटावर मात करत आम्ही मार्ग काढण्यासाठी लढत होतो, असंही ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज्यातील सर्वच गावांमधील नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवान सेवांचा आधिक चांगला लाभ मिळावा यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी राज्य शासन काम करत असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील या प्रकल्पांसाठी केंद्राने प्राधान्याने मदत करावी अशी मागणी देखील मुख्यमंनीत्र्यां या बैठकीमध्ये केली.
थोडक्यात बातम्या –
सहा वर्षे सत्तेत असूनही चुका दुरुस्त करता आल्या नाहीत का?- शरद पवार
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी, लिहून द्या नाहीतर…
अहमदनगर जिल्ह्यातील नेत्यांना सेटलमेंटची सवय लागली आहे- सुजय विखे
पेट्रोल, डिझेल दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या…
“शिवाजी महाराज होणे शक्य नाही पण सव्वाशे कोटी देशवासी ‘सेवाजी’ बनू शकतात”
Comments are closed.