‘उदयनराजेंना अटक करा’, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी माहाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीये. आज पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात (Pune Band) आला आहे.

विविध सामाजिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. कोश्यारींची लगोलग हकालपट्टी करा, अशी मागणी या संघटनांची आहे.

भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसलेदेखील सहभागी झाले आहेत. पण बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील.

शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More