बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुमचा मनसैनिक खचलाय, आता याला तुम्हीच उत्तर द्या’; मनसे पदाधिकाऱ्याची राज ठाकरेंकडे मागणी

मुंबई | बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर मनसेच्या पदाधिकाऱ्याला 1 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस दिली आहे. मनसेचे पदाधिकारी अविनाश पवार यांनी बनावट ऑडिओ तयार करुन फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर बदनामी केली असल्याचा दावा निलेश लंके यांनी केला आहे. त्यावरून आता नवा वाद रंगताना दिसत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारनेर तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी अब्रुनुकसानी प्रकरणात थेट राज ठाकरे यांनी  हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे की माझा हा व्हिडीओ राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवावा. साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही, असं अविनाश पवार म्हणाले आहेत.

11 मे रोजी माझ्यासोबत एक प्रसंग घडला. मी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात असताना पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी डॉ. गंधे यांच्या फोनवरुन फोन केला. तेव्हा डॉ. गंधे यांनी मला आमदार लंकेंसोबत बोलण्यास सांगितलं. तेव्हा लंके यांनी मला आणि मनसे पक्षाला आईवरुन शिवीगाळ केली. हे सर्व करुनही त्यांनी उलट मलाच खोटे अर्ज दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पवार यांनी केला आहे.

माझी चूक काय आहे. त्यांनी मला आईवरुन शिव्या दिल्या, माझ्या पक्षाला भंगार म्हणाले. चुका यांनी करायच्या आणि पैसे माझ्याकडे मागायचे. आमदार निलेश लंकेंपासून मला, माझ्या कुटुंबाला धोका आहे. उद्या माझं काही बरं वाईट झालं तर याला हाच व्यक्ती जबाबदार राहिल, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे या प्रकरणात काय भूमिका घेतील हे पाहणं म्हत्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

“70 वर्षांत जे कमवलं ते सगळं 7 वर्षात विकायला काढलं”

…म्हणून आमदार निलेश लंकेंकडून मनसे पदाधिकाऱ्याला 1 कोटी रुपयांची नोटीस

मुंबईतील कोरोना आटोक्यात; वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

आज महाराष्ट्रात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद; वाचा संवादातील महत्वाचे मुद्दे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More