बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या’; सुधीर मुनगंटीवारांची सरकारकडे मागणी

मुंबई | MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. यावरून भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलताना आक्रमक झाल्याचं पहायाला मिळालं.

पुण्यात एमपीएसीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली ही सरकारच्या गालावरची चपराक असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. तसेच स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत द्या, अशी मागणीही सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारकडे केली आहे.

राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार काहीही करत नाही असा आरोपही त्यांनी केला. विधानसभा अध्यक्ष निवड होत नाही याचाच अर्थ काँग्रेसला काहीच किंमत नाही, सत्तेसाठी काँग्रेस काहीही करू शकते, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

दरम्यान, सभागृहाचं कामकाज सुरु होताच सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षातील नेते संतापले. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची चमचेगिरी करण्याचं काही कारण नाही असं सांगत अनिल देशमुखांचा उल्लेख केल्याने आक्षेप घेण्यात आला.

थोडक्यात बातम्या- 

‘सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं’; प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्यानं देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप

आता ‘या’ लसीची निर्मिती भारतात होणार ; DGCI कडून अधिकृत मान्यता

‘सरकारच्या डोक्यात घालण्यासाठी हे पुस्तक आणलंय’; राम सातपुते आक्रमक

‘विद्यार्थ्यांना वास्तवाचं भान असलं पाहिजे’; कलेक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांची पोस्ट व्हायरल

‘ज्यांना आजवर कोरोना झाला नाही त्यांनी…’; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More