बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोटातले आणले, दिल्लीतले आणणार; पुण्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांना वाऱ्यावर सोडणार का?”

पुणे | पुण्यात स्पर्धा परीक्षा तसेच शिक्षणाच्या निमित्ताने आलेल्या आणि कोरोनामुळे पुण्यातच अडकून पडलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी घरी जाण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोर दिला आहे. कोटातील विद्यार्थ्यांना आणलं, दिल्लीतल्या विद्यार्थ्यांना आणणार, मग पुण्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांना वाऱ्यावर सोडणार का?, असा संतप्त सवाल एका विद्यार्थ्यानं केला आहे.

विश्वंभर भोपळे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याने ट्विटरवर माजी खासदार राजू शेट्टी यांना पुण्यातील शेतकऱ्याच्या मुलांच्या मागणीकडे लक्ष देण्याची तसेच सरकार दरबारी पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे.

राजू शेट्टी साहेब, please आता तुम्ही तरी लक्ष द्या #punestudents कडे. कोटा मधील studentsना सर्वानी 1-2 days मध्ये आणलं आहे… आता तर Delhi मधील students ना परत आणा असं काही नेतेमंडळी म्हणत आहे, म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना काय वाऱ्यावरच सोडणार आहेत का?, असं ट्विट विश्वंभरनं केलं आहे. 

दरम्यान, राज्याच्या विविध भागातून आलेली शेतकऱ्यांची मुलं सध्या पुण्यात अडकून पडली आहेत. पुण्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यानं तसेच लॉकडाऊनचे कडक निर्बंध असल्याने या मुलांच्या खाण्यापिण्याचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी ट्विटरवर नेत्यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे.

त्यातील काही निवडक ट्विट्स-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“भारतातील कोरोनामृत्यू अयोग्य आहारपद्धतीमुळे, आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा”

फोटो गॅलरी : अभिनेत्री उर्मिला कानिटकर-कोठारे

महत्वाच्या बातम्या-

मजुरांच्या घरी जाण्याच्या प्रवासाचा खर्च काँग्रेस करणार; सोनिया गांधींची मोठी घोषणा

…तर मुंबईतून केंद्र सरकारला जाणारा सगळा कर रोखू; शिवसेना खासदाराचा इशारा

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; जाणून घ्या सर्व आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More