बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुम्ही आश्वासन दिलं होतं, आता दिलेल्या शब्दाला जागा… काँग्रेसला या मित्रपक्षाचं साकडं!

मुंबई |   वर्षभरापूर्वी पार पडलेल्या 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाने केलेल्या सहकार्याबद्दल पक्षाला विधानपरिषदेच्या एका जागेवर संधी देण्याबाबत काँग्रेस पक्षाने शब्द दिला होता. आता तो शब्द पूर्ण करण्याची वेळ आली आहे अशी आठवण करून देत पीपल्स रिपब्लिकन पक्षाने जोगेंद्र कवाडे यांना विधानपरिषदेवर संधी देण्याची मागणी केली आहे.

2014 मध्ये काँग्रेस पक्षाने आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाला विधानपरिषदेमध्ये नामनियुक्त सदस्य म्हणून सन्मानपूर्वक संधी दिली होती. विधान परिषदेची  नामनियुक्त सदस्य पदाची मुदत येणाऱ्या 15 जून 2020 रोजी संपुष्टात येत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सहयोगी पक्ष तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून विधान परिषदेमध्ये आमच्या पक्षाला पुन्हा संधी देऊन सन्मानित करावे, अशी विनंती पीपल्स रिपब्लिकन पक्षाने केली आहे.

लोकसभा व विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाने गेल्या 15 वर्षापासून सर्व शक्तीनिशी सहकार्य केले आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत आपल्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली धर्मनिरपेक्ष आघाडीतील घटक पक्ष म्हणून कवाडे गटाने संपूर्ण राज्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. एवढेच नव्हे तर राज्यात महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून घटक पक्ष सहभागी आहे. महाविकास आघाडीत एक जबाबदार घटक पक्ष म्हणून काम करत असल्याने आपण विधानपरिषदेचा दिलेला शब्द पाळा, असं कवाडे गटाने म्हटलं आहे.

दरम्यान, विदर्भात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचं मोठं संघटन आहे. तसंच दलित मतांची टक्केवारी देखील मोठी आहे. त्यामुळे एकंदर विचार करता जर कवाडे गटाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर ठाकरे सरकारच्या बाजूने दलित मतं आकर्षित होण्याचा अंदाज लावला जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात आज 259 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा नव्याने किती रूग्ण वाढले…

कोरोनाबाबत महत्त्वाचं संशोधन; ‘या’ रक्तगटाच्या लोकांना अधिक धोका!

महत्वाच्या बातम्या-

कौतुकास्पद… PSI साहेबांनी लग्नाचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले 1 लाख रूपये!

कोरोना चाचणीचा दर सरकार ठरवणार, तोच रूग्णालयांना घ्यावा लागणार; ठाकरे सरकारचं महत्त्वाचं पाऊल

कोरोनाच्या गंभीर रूग्णांवर उपचारासाठी ठाकरे सरकारने उचललं सर्वांत मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More