बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राजकारणातील लोकांना अशी भीती दाखवल्यास लोकशाही संपुष्टात येईल”

नांदेड | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत असतानाच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ईडीच्या याच छापेमारीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.  नांदेड येथे पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीसांवर देखील एखादा अधिकारी आरोप करू शकतो. राजकारणातल्या लोकांना अशा पद्धतीने भीती दाखवणे चुकीचं आहे. यामुळे देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल.

कोणीतरी ‘अ’ आणि ‘ब’ चं नाव घेतंय त्यावरच कारवाई केली जातेय. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना त्रास देण्याचा हा नवा प्रकार भाजपने देशात सुरू केला आहे. असं घाबरवण्याचं काम केंद्र सरकारच्या एजन्सीज करत असतील तर लोकशाहीला सुरुंग लावण्याचं काम सुरू आहे,  केंद्रावर असा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

तसेच महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात केंद्र सरकारने सीबीआय, ईडी आणि आरबीयआयचा वापर करणे सुरु केले आहे. आरबीआयने सहकारी बँकामध्ये आमदार, खासदार आणि नगरसेवक यांना संचालक होता येणार नसल्याची नियमावली केली आहे. त्यामुळे चांगल्या चालत असलेल्या संस्था बंद करण्याचा हा उद्योग आहे,  असं देखील पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“ओबीसींच्या आरक्षणासाठी फडणवीसांनी मार्ग सांगावा, त्यांनी सत्तेत येण्याची गरज नाही”

“राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहेत, खातात शिवसेनेचं पण जागतात शरद पवारांच्या निष्ठेला”

देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, पण चिंता कायम, पाहा आकडेवारी

पुण्यातील 91 गावं कोरोना हाॅटस्पाॅट म्हणुन घोषित; कमी झालेली संख्या पुन्हा वाढली

“कंगनाचा इंदिरा गांधी चित्रपट फ्लॉप होणार, कारण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More