Top News

ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले…

वॉशिंग्टन | सध्या अमेरिकेत सत्तासंघर्ष सुरु आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत गोंधळ घातला आहे.

आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर संपूर्ण जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. तसेच या घटनेबाबत खेद व्यक्त करण्यात येत आहे.

वॉशिग्टन डीसीमध्ये झालेल्या या हिंसेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. बेकायदेशीर विरोधी आंदोलनांमार्फत लोकशाहीचा विध्वंस करु दिला जाऊ शकत नाही, असं मोदी म्हणाले.

वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या हिंसेचं वृत्त पाहून खूपचं अस्वस्थ झालो. शक्तीचं क्रमाने आणि शांततेत हस्तांतरण चालूच ठेवलं पाहिजे. बेकायदेशीर विरोधी आंदोलनांमार्फत लोकशाहीचा विध्वंस करु दिला जाऊ शकत नाही, असं नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

 

 

थोडक्यात बातम्या-

‘…तर कायमस्वरुपी बंदी आणू’; ट्विटरचा ट्रम्प यांना इशारा

“टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पुरावे सापडले”

राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढय़ात मराठी माणसांची एकजूट काय आहे हे दाखवूया- उद्धव ठाकरे

‘या’ भाजप नेत्याची चौकशी होणार; मुंबई महानगरपालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या