संजय निरुपम नरेंद्र मोदींवर भडकले; म्हणाले… ही तर संघटीत लूट!

मुंबई | भाजपप्रणित केंद्र सरकारने केलेली नोटाबंदी ही संघटीत लूट होती, असा घणाघाती अारोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. ते मुंबई बोलत होते. 

नोटाबंदीच्या अपयशामुळे देशातील नागरिक नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राजकारणातून कायमचे तडीपार करतील, असा दावाही त्यांनी केला. नोटाबंदीमुळे देशाचा अाणि सर्वसामान्यांचा काय फायदा झाला?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला शुक्रवारी 2 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त काँग्रेसतर्फे काळा दिवस पाळण्यात आला. ‘मोदी हटाव, देश बचाव’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

नोटाबंदीच्या काळात 150 पेक्षा अधिक लोकांनी आपला प्राण गमावला. लाखो कामगार बेरोजगार झाले. अनेक उद्यागधंदे बुडाले पण मोदी याबद्दल अवाक्षरही काढत नाहीत, अशी टीका निरुपम यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-ओळखीचा फायदा घेतला; कॉफीत नशेचे पेय टाकून केला बलात्कार

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका महिलेचा मृत्यू

-पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात; पहा आजचे दर

-आठवडा उलटला; अवनीच्या त्या 2 बछड्यांचं नेमकं काय झालं?

-अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या