नोटाबंदीदरम्यान किती मृत्यू झाले? PMO म्हणतं आम्हाला माहिती नाही…!

नवी दिल्ली |  नोटाबंदीच्या काळात देशात किती मृत्यू झाले?, असा प्रश्न माहितीच्या अधिकारात विचारण्यात आला होता. त्यावर PMO कार्यालयाने ‘आम्हाला माहिती नाही…!’ असं धक्कादायक उत्तर दिलं आहे.

अचानक नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर काही व्यक्तींचा बँकांच्या रांगेमध्ये मृत्यू झाला.  त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये दुर्देवाने हा आकडा जवळपास 100 पार होतोय, असं एकंदरित चित्र होतं.

PMO च्या उत्तरामुळे मात्र सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट पसरलेली पाहायला मिळत आहे.

दरम्यान, मुख्य केंद्रिय माहिती आयुक्तांसमोर झालेल्या सुनावणीवेळी PMOतील माहिती अधिकाऱ्यांनी झालेेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.

महत्वाच्या बातम्या-

नेत्यांच्या मुलाकडे की सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे; राष्ट्रवादीचं युवक प्रदेशाध्यपद कुणाकडे?

-यांच्याशिवाय ‘बेस्ट कपल’ कुठलं? ‘व्हॅलेंटाईन डे’ दिनी धनंजय मुंडेंचा सेना-भाजपवर प्रहार

मुख्यमंत्र्यांमुळे मराठा समाजाला न्याय, शिवसेना आमदाराची फडणवीसांवर स्तुतीसुमनं

राष्ट्रवादीसोबत ‘मनसे’ नातं जुळणार का?, एकीकडे राष्ट्रवादीची तर दुसरीकडे मनसेची बैठक!

नको नको म्हणता म्हणता शिवसेना युतीच्या जाळ्यात; हा असणार फॉर्म्युला?