धक्कादायक!!! महिलेच्या पोटातून काढलं तब्बल दीड किलो भंगार

अहमदाबाद | अहमदाबादच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या महिलेच्या पोटातून तब्बल दीड किलो भंगार काढण्यात आलं आहे. संगिता असं या महिलेचं नाव आहे. 

भंगारात एक इंचाचे लोखंडी खिळे, सेफ्टी पिन, हेअर पिन, ब्रेसलेट, चैन, मंगळसुत्र, आणि बांगड्या अशा वस्तूंचा समावेश आहे. 

संगिता ही एक मनोरुग्ण आहे. ती रस्त्यावर फिरताना पोलिसांना दिसली तेव्हा त्यांनी तिला मानसिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. तिथं तिच्या पोटात दुखू लागलं. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांना याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्या वस्तू बाहेर काढल्या. 

दरम्यान, संगिताला ‘एकुफेगिया’ हा मानसिक आजार आहे. हे रुग्ण अशा विचित्र वस्तू गिळतात, असे रुग्ण क्वचितच अढळतात. 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार

-जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू!

-संघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही!

-महाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का?; शिवसेनेचा सरकारला सवाल

-राम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल