बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात डेंग्यूचं थैमान! तब्बल ‘इतक्या’ हजार लोकांना डेंग्यूची लागण

नवी दिल्ली | देशात पावसाने पुन्हा हजेरी लावल्यानं वातावरण बदलताना दिसणार आहे. कोरोना महामारीचं संकट डोक्यावर असताना आता देशभरात डेंग्यूचा धोका वाढताना दिसतोय. दर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रूग्ण सापडतात. त्यातच आता देशात पुन्हा डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळताना दिसत आहे.

उत्तरेकडील राज्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा कहर पहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा या राज्यात डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आतापर्यंत तब्बल 12 हजार रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर आता महाराष्ट्रात देखील डेंग्यूचे रूग्ण सापडत आहेत.

तरूणांसह लहान मुलं देखील डेंग्यूच्या विळख्यात सापडल्याचं दिसतंय. आतापर्यंत 88 लहान मुलांसह 114 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्य़ाभरात रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अनेकांना बेड मिळत नसल्याच्या देखील तक्रारी येत आहेत. त्याचबरोबर खासगी रूग्णालयात देखील गंभीर परिस्थिती जाणवू लागली आहे.

दरम्यान, कोरोना आणि डेंग्यूची काही लक्षणं सारखी असल्यानं आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. डेंग्यू हे डासांमुळे होणारं व्हायरल इन्फेक्शन आहे. ज्यात तीव्र ताप, डोकेदुखी, अंग आणि सांधेदुखी, त्वचेवर पुरळ येणं अशी लक्षणं दिसतात.

थोडक्यात बातम्या-

पुराच्या पाण्यातील बोलेरोचा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्राही झाले चकीत, पाहा व्हिडीओ

मैदानावर पुन्हा आवाज घुमणार! प्रेक्षकांसाठी बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘मला रोहित शर्मासारखं…’; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ धडाकेबाज क्रिकेटपटूची बायको रोहितवर फिदा!

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजच्या वडिलांनी तिच्यासाठी केलं असं काही की….

‘महाराष्ट्र एटीएस काय झोपलं होतं का?’; भाजपचा सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More