बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नोटबंदीमुळे आपण कॅशलेस होण्याऐवजी लेसकॅश झालो”

नवी दिल्ली | नोटबंदीच्या निर्णयावरून अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींंना सवाल विचारले जातात. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनीही नोदबंदीवरून नरेंद्र मोदींना सणसणीत टोला लगावला आहे. नोटबंदीच्या निर्णयामुळे आपण कॅशलेस होण्याऐवजी लेसकॅश झालो, अशी टीका पी.चिदंबरम यांनी केली आहे.

नोटबंदीच्या निर्णयाला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या निर्णयामुळे लोकांचा किती फायदा झाला हा प्रश्न आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, भारतीय अर्थव्यवस्था कॅशलेस बनली पाहिजे. त्यानंतर मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आपण कॅशलेस होण्याऐवजी लेस कॅश झालो, असा सणसणीत टोला चिदंबरम यांनी लगावला आहे.

पी .चिदंंबरम पुढे म्हणाले, देशाचा काळ पैसा परत मिळावा आणि कॅशलेस व्यवहार सुरु व्हावेत यासाठी नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र नोटबंदीनंतर कुठलाही काळा पैसा बाहेर आला नाही. उलट नोटबंदीवेळी देशात 18 लाख कोटी चलनात होते. आता 28 लाख कोटी चलनात आहेत, असं म्हणत त्यांनी मोंदीचा दुसरा उद्देशही फोल ठरल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, चिदंबरम यांनी नोटबंदीचा सकारात्मक फायदाही सांगितला आहे. ते म्हणाले, नोटबंदीनंतर डिजीटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिवाय त्यांनी यावेळी केंद्राने इंधनावरील कमी केलेल्या करावरही टीका केली आहे. केंद्राला उत्पादन शुल्क मोठ्या प्रमाणात मिळाल्यामुळेच इंधनावरील कर कमी केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘लगता है मोहतरमा…’; नवाब मलिकांचं कंगणावर टीकास्त्र

भाजपच्या माजी मंत्र्यावर नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप!

“लाज लज्जा असेल तर कंगणाने देशाची माफी मागावी”

महाराष्ट्रातून महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार- जे. पी. नड्डा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More