“भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला जा, माफीचीही गरज नाही”
मुंबई | शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरेंना डिवचत खोचक टीका केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे ते शिवसेनेला नोटाचे राजकारण काय शिकवणार? जर भीती वाटत असेल तर अयोध्येत शिवसेनेचा धाक आजही कायम आहे, आदित्य ठाकरेंना विनंती करून सोबत येऊ शकता, माफी मागण्याची गरज लागणार नाही, असा टोला दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
बृजभूषण सिंह यांनी राज यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय त्यांना लखनौमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला आहे.
राज ठाकरेंना होणाऱ्या विरोधावरून दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. याआधीही दीपाली सय्यद यांनी राज यांच्यावर टीका केली आहे.
ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे ते शिवसेनेला नोटा चे राजकारण काय शिकवणार, जर भिती वाटत असेल तर अयोध्येत शिवसेनेचा धाक आजही कायम आहे. आदित्य साहेबांना विनंती करून सोबत येऊ शकता,माफी मागण्याची गरज लागणार नाही. जय श्रीराम. @mnsadhikrut @RajThackeray @ShivSena @TV9Marathi
— Deepali Sayed (@deepalisayed) May 17, 2022
थोडक्यात बातम्या-
पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या राजकीय निवृत्तीबाबत काँग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
मोठी बातमी! नवाब मलिकांची प्रकृती खालावली; महत्त्वाची माहिती समोर
इंडियन टीमच्या ‘गब्बर’ची बॉलिवूडमध्ये एंट्री, शिखरच्या नव्या इनिंगला लवकरच सुरूवात होणार
मोठी बातमी! रूपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल
Comments are closed.