बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी सरकार पाडणार नाही, तर जनताच….”

जालना | देशातील महत्त्वाच्या पाच राज्यांमधील निवडणूक निकालाचे कल निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना पक्षाकडून गोवा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये निवडणूक लढवण्यात आली होती. याठिकाणी शिवसेनेला खातही उघडता आलं नाही. त्यावरून आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

शिवसेना राष्ट्रीय पक्ष होण्याचं स्वप्न पाहत आहे. मात्र, हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. शिवसेना जिथे जिथे जाईल तिथे डिपॉझिट जप्त होईल, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. देशातील निवडणुकांमध्ये जनतेने भाजपला झुकतं माप दिलं आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रतही याचे पडसाद दिसतील, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

2024 मध्ये महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही तर जनताच हे सरकार पाडेल, असं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव उत्तर प्रदेशात नाही तर संपूर्ण देशभर आहे. जागतिक पातळीवरही नरेंद्र मोदींचे नाव घेतले जात आहे, असं रावसाहेब  दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 51 उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र, याठिकाणी एकाही जागी शिवसेनेला विजय मिळवता आला नाही. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात प्रचार केला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोव्यातही प्रचार केला होता. शिवसेनेला खातही उघडता न आल्याने रावसाहेब दानवे यांनी खोचक टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“उद्धव ठाकरे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री”

मोठी बातमी! निवडणूक निकालांचे पडसाद शेअर बाजारावर

‘उत्तरप्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’; ‘या’ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

पंजाबमध्ये सत्तापरिवर्तन; आपकडून काँग्रेसचा सुपडा साफ

“येत्या काही दिवसांत अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More