बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पैसे थेट खात्यावर जमा करा मग लॉकडाऊनचं बघा- पृथ्वीराज चव्हाण

कराड | राज्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. राज्यात कोरानाची दुसरी लाट आली आहे असं म्हटलं तरी आता वावगं ठरणार नाही. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मात्र यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका होताना दिसत आहे. अशातच ठाकरे सरकारमधील काँग्रेस पक्षाचे राज्यातील मोठे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना काही मागण्या केल्या आहेत. याबाबत चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रक काढलं आहे.

मुंबई-पुण्यासह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन करावे की कसे यावर प्रशासन, वैद्यकीय तज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आणि सामान्य जनता यांमधून वेगवेगळे मतप्रवाह पुढे येत आहेत. महाराष्ट्रात उद्योजक असो किंवा वैद्यकीय तज्ञ प्रत्येकजण निडरपणे आपले मत मांडू शकतो ही आश्वासक बाब असली तरीदेखील शासनासमोर मात्र गंभीर पेचप्रसंग आहे. परिणामी राज्य पातळीवर लॉकडाऊनची अपरिहार्यता निर्माण झाल्यास खालील बाबी विचारात घेणे आवश्यक असल्याचं चव्हाणांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्या, तर लॉकडाऊनचा कालावधी कमीत-कमी ठेवा तर लॉकडाऊन काळात बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा. यासाठी प्रसंगी आमदार आणि खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करावा आणि शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालू ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होऊ देऊ नका, या मागण्या पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने गेल्या वर्षी मार्चमध्ये अचानकपणे कोणतेही नियोजन न करता लॉकडाऊन घोषित केला होता. भारतातील 3 कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

गिरीश महाजन म्हणाले ईडी आली की कोरोना होतो, आता एकनाथ खडसेंचा पलटवार, म्हणाले…

इंदोरीकरांनी मुला-मुलीच्या जन्माबाबत केलेल्या वक्तव्यावर न्यायालयाने 8 महिन्यांनी दिला ‘हा’ मोठा निकाल

…म्हणून पून्हा शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

‘ईडी’च्या नोटिसा पाहून एकनाथ खडसेंना कोरोना होतो, पण माझं तसं नाही- गिरीश महाजन

‘…तर रात्रीचे नियम सकाळी लावावे लागतीत’; मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याचा जनतेला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More