बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वंचितचा सर्व राजकीय पक्षांना धक्का; पोटनिवडणुकीत 6 जागांवर मिळवलं यश

अकोला | सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पोटनिवडणुकांकडे लागलं आहे. काल झालेल्या निवडणुकाची आज मतमोजणी जाहीर होत आहे. त्यामुळे सगळीकडे निकालाची रणधुमाळी पहायला मिळत आहे. अशातच आता अकोल्याचा निकाल समोर येत आहे.

अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. अकोल्यात वंचित बहुजन आघाडीनं आपला झेेंडा फडकावला आहे. एकूण 14 जागांसाठी पोटनिवडणुकेत लढत झाली. त्यापैकी 6 जागांवर वंचित बहुजन आघाडीनं शिक्का मोर्तब केला आहे. त्यामुळे आघाडी करून निवडणूक लढणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या आहेत.

राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना पराभूत करत जनशक्ती पक्षाच्या उमेदवार स्मृती गावंडे विजयी झाल्या आहेत. त्यामुळे तेथे उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे.

दरम्यान, कुटासा हे अमोल मिटकरी यांचं गाव असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा तिथे लागून होती. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी कुटासा जिल्हा परिषद गटात भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी यांनी केला.

थोडक्यात बातम्या – 

…आणि म्हणून काँग्रेस उद्यापासून ‘जेलभरो’ आंदोलन करणार

पोलिसांनी भाजपच्या माजी महिला खासदाराला केस ओढत धक्के देत गाडीत ढकललं, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा एकदा बाॅम्बे रुग्णालयात दाखल

शिवसेना खासदार पुत्राचा पालघरमध्ये पराभव

कायदा मोडणार नाही, पण लखीमपूरला जाणारच; राहुल गांधींचं मोठं स्पष्टीकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More