बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘केंद्र सरकारने महाराष्ट्राला…’; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्राला केली ‘ही’ विनंती!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र पावसानं हाहाकार माजवला आहे. मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी तसेच जीवितहानी झाली आहे. राज्यभर जोरदार पाऊस पडल्यानं शेतकरी आणि शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पाऊसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राकडे मदत मागितली आहे.

शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांसोबत सतत संपर्कात आहोत. पावसामुळे सोयाबीन, कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सध्या शेतीचे पंचनामे चालू असून पीकवीम्यासंदर्भात विमा कंपन्यांना शंभर टक्के मदत करायला सांगितलं असल्याचं अजित पवार म्हणाले.

केंद्र सरकारकडून एनडीआरएफचं पॅकेज दिलं जातं मात्र आतापर्यंत अपेक्षित असं पॅकेज मिळालेलं नाही. केंद्र सरकारने आपलेपणाची भावना दाखवनू मदत केली पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पावसामुळे हातातोंडाशी आलेलं सोयाबीन पीक पाण्यात वाहून जात आहे. काही सोयाबीन पीक हे प्रमुख पीक आहे. यावरच शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे आता पावसानं शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ बसल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या- 

बाबो! ‘मनिके मागे हिते’ गाणं गातानाचा रानू मंडलचा व्हिडीओ नेटकऱ्यांना घालतोय भुरळ, पाहा व्हिडीओ

…तरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला पालकमंत्रिपदावरून हटवतील- छगन भुजबळ

मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर भाजप प्रवेशाबाबत अमरिंदर सिंग यांनी सोडलं मौन; म्हणाले…

आर. आर. पाटलांच्या बंधूंचा आईसोबतच्या व्हायरल फोटोमागील कारण ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!

“व्वा रे बिट्या, तुला कुणी सांगितलं?; महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरूंगात जाईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More