बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांना मोठा दिलासा, ‘या’ नियमाबाबत अजित पवारांचे मोठे संकेत

पुणे | गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यातील कोरोनाची आकडेवारी कमी होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पुण्यातील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून होत आहे. सध्या पुण्यात दुकानांना चार वाजेपर्यंत परवानगी असून शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुकानांना सात वाजेपर्यंत उघडे ठेवण्याचा विचार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.

पुण्याचा कोरोनाबाधित रूग्णांचा दर 3.9 इतका असून 1.6 टक्के इतका मृत्यु दर आहे. त्यानुसार आपण लेव्हल तीनमध्ये येतो. त्यामुळे सोमवारपासून दुकानांना सात वाजेपर्यंत उघडे ठेवण्याचा विचार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या उपस्थितीती बैठक पार पडली. यावेळी पिपंरी-चिंचवड महापालिका महापौर, महापालिका आयुक्त पोलीस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता आपली सर्व तयार झाली आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट येऊ नये, अशी आमची सर्वाची भावना असली तरी प्रशासन आणि पुढील धोके लक्षात घेत प्रशासन सज्ज असल्याचं अजित पवारांनाी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना लसींचे दोन डोस घेतलेलया नागरिकांना काही सवलती देण्याचा विचार चालू असल्याचंं पवारांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

मृत म्होक्याचा वाढदिवस अन् रावण टोळीचा प्लॅन, पोलिसांनी दाखवला इंगा

#TokyoOlympics | मिराबाई तुझा भारताला अभिमान, मिळवून दिलं पहिलं पदक

तळीये गावात क्षणात होत्याचं नव्हतं झालं, सलग 40 मृतदेह रांगेत!

प्रसिद्धीसाठी कायपण! ‘या’ 7 अभिनेत्रींच्या न्यूड फोटो-व्हिडीओंचा इंटरनेटवर धुमाकूळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More