महाराष्ट्र मुंबई

सामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार

मुंबई | सध्या संपूर्ण राज्य कोरोना विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच हळूहळू राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.

कोरोनामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. स्वत: काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण कोरोनावर मात करू शकतो. ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे, अजित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील उद्योग सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र कामगार परराज्यात निघून गेल्यामुळे काही अडचणी येत आहेत. वेळ लागेल मात्र परिस्थिती निश्चितच पूर्वपदावर येईल, असं अजित पवार म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

…तर आळंदीत लग्न करता येणार नाही; ही अट पूर्ण करावी लागणार!

लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार?, मात्र ही क्षेत्रं घेऊ शकतात मोकळा श्वास

महत्वाच्या बातम्या-

मी नरेंद्र मोदींशी बोललो, चीनप्रश्नी ते चांगल्या मूडमध्ये नाहीत- डोनाल्ड ट्रम्प

…हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही- जितेंद्र आव्हाड

“कोरोनाच्या संकटात समाजकार्य करा, साहेबांच्या स्मृतीदिनी गडावर गर्दी नको”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या