बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर इतर सर्व महामंडळातील कर्मचारीही विलीनीकरणाची मागणी करतील

पंढरपूर | एसटी विलीनीकरणाबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “एसटीचे विलीनीकरण केले तर इतर महामंडळातील कर्मचारीदेखील विलीनीकरणाचीच मागणी करतील, असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार पांडुरंगाच्या शासकीय पुजेसाठी पंढरपुरला आले होते. महापुजेच्या कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अजित पवार यावेळी म्हणाले, “एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केलं तर राज्यातील इतर महामंडळातील कर्मचारीही तीच मागणी करतील. अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, कोतवाल, पोलिस पाटील हे देखील विलीनीकरणाची मागणी करू शकतात”, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवरही निशाणा साधला.

यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा देणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनाही त्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. “गेल्या 60 वर्षात कधी एसटीचा सरकारमध्ये विलीनीकरणाचा मुद्दा समोर आला नव्हता. मात्र मुद्दाम हा प्रश्न चिघळवला जात आहे. राज्यातील विरोधी पक्ष मुद्दाम विविध मुद्दे काढून राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.” अशी टीका त्यांनी केली आहे.

शिवाय यावेळी त्यांनी विठ्ठलाकडे राज्याला सुख, शांती लाभावी, वारीची परंपरा अशीच कायम सुरू राहावी, असे साकडे घातले आहे. त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना कोरोनासंदर्भात काळजी घेण्याचं आवाहनही यावेळी केलं आहे. ते म्हणाले, “कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करा.”

 

थोडक्यात बातम्या-

वयाच्या 100 व्या वर्षी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली

आता आधी पैसे मगच वीज, ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

भाजपचा मोठा निर्णय?, चित्रा वाघ यांच्यासाठी आनंदाची बातमी

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच, पाहा आजची आकडेवारी

महाराष्ट्रातील आजची कोरोना रुग्णसंख्या जाणून घ्या एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More