बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकार पडणार असं बोललं जात आहे, पण चाललंय ना बाबा सरकार”

पुणे | भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी नुकताच राज्यातून लवकरच महाविकास आघाडी सरकार संपुष्टात येईल, असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ज्याच्या बुद्धीला जे पटलं ते बोलले,’ असा प्रतिहल्ला त्यांनी नारायण राणेंवर केला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

पवार यावेळी म्हणाले, ‘ज्या दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. तेव्हापासून सरकार पडणार असं बोललं जात आहे. पण चाललंय ना बाबा सरकार. कोण कोण काय बोलतयं ते तुम्ही कोट करून ठेवता,’ अशा मिश्किल शब्दात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवाय यावेळी त्यांनी सरकारला काहीचं धोका नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पवारांनी पुढे राणेंना टोला लगावला आहे, ते म्हणाले, ‘त्यांच्या सदसदविवेक बुद्धीला जे जे योग्य वाटतं ते ते बोलतात,’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 2024 मध्ये स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. पवारांनी यावेळी या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ‘पटोलेंना आमच्या शुभेच्छा आहेत.’ असं ते म्हणाले.

अजित पवार पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. आढावा घेऊन झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नारायण राणे यांनी केलेल्या दाव्याबरोबरच इतरही अनेक मुद्द्यावरून माध्यमांशी चर्चा केली. शिवाय त्यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात तोंड घालणारे मांजर”

“वीर दासने दोन भारत दाखवले म्हणून उच्चभ्रूंच्या कपाळात…”

शेअर बाजारात घसरण पण ‘बिगबुल’च्या शेअर्समध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ

मुंबईतील कोरोनाबाधितांसह मृतांची संख्याही दिलासादायक, वाचा ताजी आकडेवारी

“जरा जास्तच मुदत दिल्याबद्दल नारायण राणेेेंचे आभार”, जयंत पाटलांचा पलटवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More