मुंबई | उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी फडणवीस कामाला लागले आहेत. त्यांनी काल रोजी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभळत ते मंत्रालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. ही बैठक ओबीसी आरक्षणासंदर्भात होती. ओबीसी आरक्षणासाठी तातडीने कारवाई करावी, त्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करावे अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला भाजप नेते प्रवीण दरेकर, संजय कुंटे आणि मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट आणि भाजप यांनी आघाडी करत सरकार स्थापन केलं. त्यानंतर फडणवीस या सरकारचं नेतृत्व करतील असं सर्वांना वाटत होतं. पण राजकारण झालं आणि त्यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतला. या निर्णयावर फडणवीस नाराज असल्याचं नंतर कळालं.
काल (1जुलै) रोजी फडणवीसांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रालय गाठलं. आणि नवीन सरकारची पहीली कॅबिनेट बैठक झाली. काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती होती. त्यांची जयंती ही महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. याच शुभमुहुर्तावर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संबंधित माहिती दिली. तसेच यावेळी अधिकाऱ्यांना जलयुक्त शिवार योजना पुन्हा कशी सुरु करता येईल याबाबत नियोजन करण्याची सूचना केली.
तसेच मेट्रो कारशेड आरे काॅलनीतच बनवण्याबाबत न्यायालयात बाजू मांडण्याची तयारी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत सूचना केल्या. ओबीसी आरक्षण लागू व्हावं यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील ते सर्व करा, अशा सूचना फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
थोडक्यात बातम्या –
उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा झटका; नेतेपदावरून केली हकालपट्टी
‘कोरोनासाठी एलियन्स जबाबदार’, किम जोंग उनचा विचित्र दावा
“कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी हे सरकार सज्ज”
राज ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव, पत्र लिहित म्हणाले…
संजय राऊतांची चौकशी सुरू असलेलं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय, वाचा सविस्तर
Comments are closed.