”मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही हे मला माहित होतं.”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुबंई | महाराष्ट्रात 6 महिन्यापूर्वी सत्तांतर झालं. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. अनेक महत्त्वाची कामं सरकारनं केली आहेत. अशातच येत्या निवडणुकीकडं सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. अशातच महाराष्ट्रात पुढे कोणत्या व्हिजनने काम होईल हे पाहणं गरजेचं आहे.

त्यासाठीच एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

सत्तांतर झाल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री व्हाल असं वाटलं होतं पण तसं झालं नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले मी पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही हे मला आधीपासूनच माहित होतं, याबद्दल मला काही अडचण नाही.

मुख्यमंत्री न होणं हा माझाच निर्णय होता. मला खूप उशीरा मी उपमुख्यमंत्री होणार हे मला कळलं होतं. ज्यावेळी हे सगळं घडलं तेव्हा मला मुख्यमंत्रीपद नको असल्याचं पक्षाला सांगितलं होतं. मी सरकारच्या बाहेर राहुनच पक्ष बळकट बनवण्याचा विचार करत होतो.

यावेळी बोलताना फडणवीसांनी ठाकरेंना टोला देखील लगावला आहे. यावेळी ते म्हणाले सगळ्यातआधी मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. ते जे वागले त्यामुळेच हे सरकार येऊ शकलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या