बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अयोद्धा-काशी जारी है, मथुरा की अब तैयारी है”

मुंबई | गेल्या 3 दशकांपासून देशाचं राजकारण राम मंदिराच्या (Ayodhya Ram Temple) मुद्द्याभोवती फिरत होतं. राम मंदिराच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ऐतिहासिक निकाल दिला. त्यानंतर हिंदूत्ववादी संघटनांनी आणि भाजपने (BJP) ‘काशी और मथुरा बाकी है’,  नारा दिलाय. अशातच आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पुन्हा काशी आणि मथुराचा नारा लगावताना दिसत आहे. (Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya announced Ayodhya-Kashi-Mathura)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता उत्तर प्रदेशचं (Uttar Pradesh) राजकारण तापताना दिसतंय. या निवडणुकीत भाजप पुन्हा हिंदूत्वाच्या मुद्द्याला धरून निवडणुकीत उतरेल, अशी चिन्हे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे प्रमुख नेते काशी आणि मथुराच्या घोषणा देत आहे. आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी अयोद्धा-काशी-मथुराच्या घोषणा दिल्या आहेत.

केशव प्रसाद मौर्य यांनी ट्विट करत निवडणुकीचे संकेत दिले आहेत. ‘अयोध्या काशी भव्य मंदिर निर्माण जारी है, मथुरा की तैयारी है’, असं ट्विट केशव प्रसाद मौर्य (Tweet Keshav Prasad Maurya) यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळे आता उत्तर प्रदेशात भाजप हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून निवडणुकीत उतरेल असं दिसतंय.

दरम्यान, मथुरेमधील शाही ईदगाहत काही संघटनांनी संकल्प यात्रेसह जलाभिषेक करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता आसपासच्या परिसरात देखील बंदोबस्त वाढवला होता.

पाहा ट्विट-


थोडक्यात बातम्या-

“भंगार Nawab Malik स्वतःला डिटेक्टीव्ह करमचंद समजायला लागलाय”

Omicron: ओमिक्रॉनवर लस कधी बनणार?, आली ‘ही’ माहिती समोर

‘काँग्रेस एकला चलो साठी सुद्धा तयार’; ‘या’ काँग्रेस खासदाराचं मोठ वक्तव्य

ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 1 जानेवारीपासून ‘हे’ नियम बदलणार

मोठी बातमी! आता नागपूरात एंट्री करायची असेल तर ‘ही’ अट करावी लागेल पूर्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More