पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश!

मुंबई | बंगालच्या उपसागरात चालू असणाऱ्या गुलाबी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागाला फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी पूरात अडकलेल्या नागरिकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

तसेच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे हवामान खात्याने राज्यातील 5 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर 15 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट सांगितला आहे. यामुळे या सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाला देखील सतर्क राहण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठविण्यात आल्याची माहिती देखील दिली आहे. तसेच राज्य व जिल्ह्यांच्या आपत्कालीन मदत यंत्रणांनी सतर्क आणि परस्परांच्या संपर्कात राहून आपत्तीग्रस्तांसाठी बचाव व मदतकार्य तातडीने सुरु करावे, असा सूचना देखील अजित पवार यांनी यावेळी दिल्या आहेत.

दरम्यान, मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आले आहेत. यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. गेल्या 48 तासांमध्ये मराठवाड्यातील 10 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर 200 हून अधिक दुभती जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत.

थोडक्यात बातम्या –

शिवभोजन थाळी आता मोफत नाही, 1 ऑक्टोबरपासून ‘इतक्या’ रुपयांना मिळणार थाळी!

पांड्या इज बॅक! सलग तीन पराभवानंतर मुंबईची गाडी विजयी पथावर, पाहा व्हिडीओ

भावा तूच रे! कृणाल पांड्याच्या खिलाडूवृत्तीमागे हिटमॅन रोहितचाही हात, पाहा व्हिडीओ

…तर आपलं सीट शंभर टक्के निवडून आलं समजा- सुप्रिया सुळे

प्रिती आणि रितेशच्या व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओवर जेेनेलिया म्हणाली…

Ajit PawarDeputy Chief MinisterDistrict AdministrationMarathi NewsNCPPolitics Newsअजित पवारउपमुख्यमंत्रीजिल्हा प्रशासनमराठी बातम्याराजकारण बातम्याराष्ट्रवादी