बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं महत्त्वाचं आवाहन

मुंबई | वादळाचा जोर ओसरेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं ‘निसर्ग’ चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणार आहे.

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावं. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर जाऊ नये, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.

चक्रीवादळापासून जीवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज ठैवण्यात आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

राज्याची संपूर्ण यंत्रणा तत्पर असून आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचं नियोजन झालं आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्याने नागरिकांनी सावध, सुरक्षित रहावं, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

“कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या डॉक्टरांना कोरोना योद्धा जाहीर करा”

असाल तुम्ही सर्वेसर्वा पण…; राज्यपालांविरुद्ध मनसे नेत्या रूपाली पाटील आक्रमक

महत्वाच्या बातम्या-

निसर्ग चक्रीवादळ धडकण्यापूर्वी पावसाचा तडाखा, पाहा कुठे कुठे आहे पावसाचा जोर?

पुण्यात पाचव्या टप्प्यातील सवलती जाहीर, पाहा कोणत्या गोष्टी सुरु कोणत्या बंद?

निसर्ग परीक्षा घेतोय पण आपण ताकदीने सामना करु- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More