बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् चक्क अजित पवार थेट धरणाच्या मधोमध अडकले, त्यानंतर म्हणाले…

पुणे | पुण्याच्या मावळ तालुक्यात कासारसाई धरण आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज याच कासारसाई धरणातील मत्स्यव्यवसायाची पाहणी करायला पोहोचले. पण मत्स्यव्यवसायाची पाहणी करायला गेलेले अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले. अजित पवार तराफ्यावर बसून मत्स्यव्यवसायाची पाहणी करायला निघाले खरे पण तराफ्याचं इंजिन मधेच बंद पडलं.

कासारसाई धरण परिसरात बऱ्यापैकी मत्स्यव्यवसाय सुरू आहे. याचीच पाहणी करण्यासाठी अजित पवार सकाळी 7 वाजता तिथे पोहोचले. गाडीतून उतरताच त्यांच्यासाठी तराफ्याची सोय करण्यात आली होती. कारण धरणाच्या मधोमध पिंजरा बसवण्यात आला आहे. तिथे पोहोचायचं असेल तर तराफा किंवा बोटीची मदत घ्यावी लागते. अजित पवारांनाही त्याची कल्पना देण्यात आली होती.

अजित दादा पहाटेच पोहोचल्याने तराफ्याच्या मालकालाही घाम फुटला. तराफ्यावर जास्त जणांनी चढू नये, असं सांगूनही कोणी ते मनावर घेतलं नाही. अजित पवार आधी तराफ्यावर चढले आणि त्यांच्यापाठोपाठ बरेच लोकही तराफ्यावर चढले. साहजिकच जास्तीच्या भाराने तराफ्याचं इंजिन बंद पडलं.

खूप प्रयत्न करूनही इंजिन काही सुरू झालं नाही. शेवटी शेजारची बोट जवळ आली आणि अजित पवारांनी पुढच्या प्रवासाला बोटीने सुरूवात केली. या सगळ्यात अजित पवारांचीही चांगलीच दमछाक झाली. इथलं पर्यटन म्हणजे खूप कसरत, अशी टिप्पणीही अजित पवारांनी बाहेर येताच केली.

 

थोडक्यात बातम्या-

महामार्गासाठी जमीन दिल्यास मिळणाऱ्या मोबदल्यात कपात; शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुर

“फोनवरून टिका करणं सोपं आहे, मात्र तिकडे एनसीबीचे लोक लढा देतायेत”

प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनित पाठकचा पत्नीसोबतचा बेडरुममधील ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

शासकिय आणि निमशासकिय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

अखेर ब्रिटननं भारताचं ऐकलं; दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More