बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चुकीला माफी नाही’ गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

नाशिक | भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीवरून राज्यातील राजकारण तापलेलं दिसत आहे. सोलापुरमध्ये संध्याकाळी पडळकरांच्या गाडीवर हल्ला झाला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हातात कायदा घेण्याचं कारण नाही. ज्यांनी चूक केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये अजित पवार बोलत होते, ते तिथे खरीप हंगामाच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी बैठकीला मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

तर दुसरीकडे गोपीचंद पडळकरांसह आणि 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर बोलताना पडळकर म्हणाले की, पुण्यात पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करताना हजारोंची गर्दी करणाऱ्या अजित पवारांवर आधी गुन्हा दाखल करा. पंढरपुरात जयंत पाटील यांनी मोठी गर्दी जमा केली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. हल्ल्यानंतर पडळकरांनी भाष्य करताना शरद पवांरांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, प्रस्थापितांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे. अशा भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील, तर हा तुमचा गोड गैरसमज असल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने पडणार, फक्त वेळेचा प्रश्न आहे”

“शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय ते योग्य नसून कृषी कायद्यात बदल आवश्यक”

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; एलपीजी गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ

“केंद्राला काय करायचं ते करूद्या, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही”

सीताच्या भूमिकेसाठी करीनाने मागितलं होतं ‘इंके’ मानधन, तापसीनं केली बेबोची पाठराखण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More