तेजप्रतापच्या धमकीमुळे सुशील मोदींनी मुलाचं विवाहस्थळ बदललं!

पाटणा | बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे. लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रतापने धमकी दिल्यामुळे सुशील मोदी यांनी हा निर्णय घेतल्याचं कळतंय. 

सुशील मोदी यांचा मुलगा उत्कर्षचं लग्न याआधी राजेंद्र नगरमधील शाखा मैदानात होणार होतं. मात्र आता हेच लग्न पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात ठेवण्यात आलंय.  

तेजप्रताप यांनी सुशील मोदींना घरात घुसून मारण्याची तसेच मुलाच्या लग्नात हंगामा करण्याची धमकी दिली होती. दरम्यान, लालू प्रसाद यांनी आपण आपल्या मुलाला समजावलं असून सुशील मोदींनी आनंदाने आपल्या मुलाचं लग्न करावं, असं म्हटलं होतं.