बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील उपायुक्तांचं भांडं फुटलं, घरात कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं!

पुणे | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यातील उपयुक्तांवर मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. जात पडताळणी समितीचे सदस्य आणि उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भांडाफोड केला आहे. एसीबीने अचानक केलेल्या या कारवाईनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

नितीन चंद्रकांत ढगे हे जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्यासाठी 8 लाख रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार एसीबीकडे आली होती. तक्रारदाराने तक्रार दाखल करताच उपयुक्तांचा भांडाफोड करण्यासाठी एसीबीने एक सापळा रचला. यानुसार नितीन ढगे यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं.

यानंतर नितीन ढगे यांच्या घरी देखील सर्च ऑपरेशन करण्यात आलं. या सर्च ऑपरेशनमध्ये ढगे यांच्या घरी तब्बल 1 कोटीहून अधिक रक्कम मिळाली आहे. तसेच दीड कोटीहून अधिक रकमेचे कागदपत्रे देखील एसीबीला मिळाली आहेत.

दरम्यान, वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन ढगे सध्या एसीबीच्या ताब्यात आहेत. एसीबीचे अधिकारी याप्रकरणी आणखी तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या –

“काश्मीर बिहारींना सोपवा, 15 दिवसांत सुधारुन दाखवू”

“येत्या 15 दिवसांत भाजपचे 6 आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”

तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा ताजे दर

“नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय, कोणी किती महसूल गोळा केला हे येईल समोर”

“कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेत नाहीतर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More