नवी दिल्ली | दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकूण आठ हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित होते. दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारनंही यावर टीका केली. यावर गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी त्याला उत्तर दिलं आहे.
गुजरात मॉडेल कामाला लागलं आहे. जे सरकार कोट्यवधी हिंदू देशवासियांना आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभुत सविधा देऊ शकले नाही. ज्यांच्याकडे कोट्यवधी हिंदूची तपासणी करण्यासाठी किट नाही. ते सरकार तबलिगी मर्कझ’वर खापर फोडून संकटाच्या प्रसंगालाही धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न करीत आहे. लाज वाटली पाहिजे, असं जिग्नेश मेवानी यांनी म्हटलं आहे.
तबलिगी मर्कझमध्ये धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्यांपैकी 30 जण करोना बाधित असल्याचे चाचण्यांत स्पष्ट झालंं आहे. त्यातील तीन जणांचा काही दिवसांत मृत्यू झाला आहे.
दरम्यान, ‘तबलिगी मर्कझ’मध्ये सहभागी झालेले आठ इंडोनेशियन मुस्लीम धर्मप्रसारक हे उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील मशिदीत सापडले आहेत. नागिना भागातील या मशिदीतून त्यांना ताब्यात घेतलं.
गुजरात मॉडल काम पर लग गया है :
जो सरकार करोड़ो हिंदू देशवासियों के स्वास्थ के लिए बेसिक सुविधाओं का इंतजाम नहीं कर पाई, जिसके पास करोड़ो हिंदू जनता की जांच के लिए किट तक नही। वह सरकार #TablighiJamaat पर ठीकरा फोड़कर संकट की इस घड़ी को भी कोमवादी रंग देना चाहती है। शर्म आनी चाहिए— Jignesh Mevani (@jigneshmevani80) April 1, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“कठीण काळात देखील पंतप्रधान मोदींनी केअर फंड उघडून प्रसिद्धीची संधी सोडली नाही”
अमेरिकेच्या नागरिकांना यावेळी नक्कीच लाज वाटत असेल; ट्रम्प यांच्यावर भडकली सोनम कपूर
महत्वाच्या बातम्या-
आता चिंता अधिक वाढली; कोरोनामुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
निजामुद्दीन ‘मरकज’साठी गेलेल्या राज्यातील लोकांनी स्वतःहून समोर यावं- अनिल देशमुख
“देशात आणीबाणी लागू करा, लष्कर बोलावून परिस्थिती नियंत्रणात ठेवा”
Comments are closed.