Vishnu Chate Phone | बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्या प्रकरणाला आता महिना उलटला आहे. मात्र, यातील एक आरोपी अजूनही फरार आहे. या प्रकरणात आतापर्यंत सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना अटक झाली आहे. कालच, या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला. (Vishnu Chate Phone)
एसआयटीने हा मोक्का लावला आहे. मात्र, वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला नाही. वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. त्याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल नाहीये, त्यामुळे कराडवर मोक्का लावण्यात आला नाही. याच खंडणी प्रकरणातील महत्वाचा पुरावा ज्या फोनमध्ये आहे, तो फोन सीआयडीला आणखी सापडला नाही.
विष्णु चाटेचा फोन अजूनही सापडेना
विष्णू चाटेचा (Vishnu Chate Phone) मोबाईल अजूनही ‘सीआयडी’ला मिळाला नसल्याची माहिती आहे. विष्णू चाटे फरार असताना त्याने हा फोन नाशिकमध्ये फेकून दिला होता, असं सीआयडीला सांगितलंय. संतोष देशमुख हत्याप्रकरणात आतापर्यंत पाच मोबाईल जप्त केल्याची माहिती आहे. आत्तापर्यंत जप्त केलेले सर्व मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. यामध्ये विष्णु चाटेचा फोन अत्यंत महत्वाचा आहे.
याच मोबाइलबाबत काल केज जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना सरकारी वकिलांना न्यायाधीशांनी काही प्रश्न केले होते. जर 25 दिवसापासून हा आरोपी तुमच्या ताब्यात आहे, तर आणखी मोबाईल आढळून कसा आला नाही?, असा सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला होता. दरम्यान, 2 कोटींच्या खंडणीसाठी कराडने 29 नोव्हेंबररोजी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन केला होता. विष्णू चाटेच्या मोबाइलवरून हा कॉल करण्यात आला होता. त्यामुळे खंडणीच्या तपासात हा फोन महत्वाचा पुरावा आहे. मात्र, विष्णु चाटेने या फोनबाबत सीआयडीला कोणतीच माहिती दिली नाही.
आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार
सध्या सीआयडीकडे फक्त खंडणी प्रकरणातील फिर्यादी शिंदे यांच्या फोनमधील कॉल रेकॉर्डिंग आहे. या कॉल रेकॉर्डिंगची सध्या तपासणी केली जात आहे. यातील आवाज आणि वाल्मिक कराडच्या आवाजाची तपासणी केली जाणार आहे. तर, ज्या फोनवरून धमकी देण्यात आली तो विष्णु चाटेचा फोन अजूनही सापडलेला नाही.
तसेच जे 5 मोबाइल जप्त करण्यात आले त्यात दोन मोबाइल जयराम चाटे आणि महेश केदार यांचे आहेत. तर उर्वरित तीन मोबाइल कोणाचे आहेत, या तपासासाठी ते फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. सीआयडी सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण, दोन कोटींची खंडणी, मारहाण व अॅट्रॉसिटी या गुन्ह्यांचा तपास करत आहे. हत्या प्रकरणात सात आरोपी अटकेत असून, कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरारच आहे. त्याचा देखील शोध अजूनही सुरूच आहे. (Vishnu Chate Phone)
News Title : Deshmukh Case Vishnu Chate Phone not found
महत्त्वाच्या बातम्या-
ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे दर
हार्ट अटॅक नव्हे तर…टिकू तलसानिया यांना झालंय तरी काय?; प्रकृती अत्यंत नाजुक
दिवसाची सुरुवात आनंदवार्ताने, पेट्रोल-डिझेलचे दर ‘इतक्या’ रुपयांनी घसरले?
आजचे राशीभविष्य! कुंभ, मकर व तुळसह ब्रह्म योगात ‘या’ राशींचं भाग्य उजळणार
“धनंजय मुंडे तुमची टोळी थांबवा”, अन्यथा….; जरांगे पाटलांचा इशारा