सरपंच हत्या प्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक, केल्या ‘या’ मोठ्या मागण्या?

Walmik Karad

Walmik Karad l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ला निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र आता त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र अद्यापही या हत्या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली नाही. तसेच या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीवर देखील मोक्का लावण्यात आला नसल्याने मस्साजोग गावात नागरिक आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या :

राज्यसरकारने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध चौकशी समित्या नेमल्या आहेत. अशातच आता या घटनेतील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे वारंवार बोललं जात आहे. मात्र वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. मात्र आता या प्रकरणी वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहेत. तसेच या मागणीसाठी आज मस्साजोगचे ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील विविध भागात आक्रोश मोर्चा काढण्यात आले. यावेळी या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, अशी मागणी करण्यात येत आहे.मात्र या प्रकरणावरुन वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले जात आहेत. अशातच आता मस्साजोगच्या ग्रामस्थांकडून आज 13 जानेवारीला टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येणार आहे. तर 14 जानेवारीला मकर संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

Walmik Karad l मस्साजोग ग्रामस्थांच्या मागण्या काय? :

– वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करून मोक्का लावावा.
– याप्रकरणातील फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी.
– संतोष देशमुख हत्या प्रकरणी शासकीय वकील म्हणून उज्वल निकम किंवा सतीष मानशिंदे यांची तात्काळ नियुक्ती करावी.
– याशिवाय SIT कमिटीमध्ये पंकज कुमावत या अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करावी.
– या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला आहे? याची माहिती संतोष देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी.
– केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सहआरोपी करण्यात यावे, या विविध मागण्यांसाठी आज मस्सजोग गावात आंदोलन करण्यात येणार आहे.

News Title :  Deshmukh Murder case Massajog villager agitation what is demand

महत्वाच्या बातम्या –

आज नवपंचम योगामुळे ‘या’ राशींचे लोक यशस्वी होणार!

सरपंच हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट, वाल्मिक कराडविरोधात मोठी कारवाई

कृषीमंत्री जवळचे सांगत शेतकऱ्यांची फसवणूक, वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा उघड

परळीत आणखी एका सरपंचचा मृत्यू, सर्वत्र एकच खळबळ

‘त्या’ फोनबाबत विष्णु चाटे तोंड उघडेना; CID कडून अजूनही तपास सुरूच

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .