बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशमुख यांच्यावर दाखल केलेला खटला बेकायदेशीर; कसाबलासुद्धा कायद्याचा फायदा मिळाला आहे”

मुंबई | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावल्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरूद्ध FIR दाखल केली होती. देशमुख यांनी याच FIRला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी अनिल देशमुख यांची बाजू मांडली.

देशमुख यांच्यावर दाखल केलेला खटला बेकायदेशीर आहे आणि कायदेशीर प्रक्रियेचा भंग करणारा आहे. कसाबसारख्या व्यक्तीलासुद्धा या देशात कायद्याच्या फायदा मिळाला आहे. इथे प्रत्येकाला कायद्यानुसार संरक्षण दिलं जातं. सीबीआय चौकशी एप्रिल महिन्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानं सुरू झाली होती. अनिल देशमुख यांच्याविरोधात खटला चालवण्यापूर्वी केंद्रीय एजन्सीने राज्य सरकारची मंजूरी घेतली नव्हती, असं वकील अमित देसाई यांनी सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयात युक्तिवाद केला.

देशात फेडरल व्यवस्था आहे. पोलीस, न्याय आणि इतर पातळीवर ही व्यवस्था असते. आपल्याला संविधान आणि व्यवस्थेचं रक्षण करावं लागेल. प्रत्येक राज्यात पोलीस यंत्रणा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. प्रत्येक राज्यातील पोलीस विभाग त्या त्या राज्यातील गुन्ह्यांचा तपास करत असतो. एक राज्यातील पोलीस दुसऱ्या राज्यात जाऊन तिथल्या गुन्ह्यांचा तपास करत नाही. मग सीबीआय विनापरवानगी राज्यात कशी आली? असा सवालही त्यांनी उच्च न्यायालयासमोर उपस्थित केला.

दरम्यान, अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि सहाय्यक संजीव पालांडे यांना ईडीने पीएमएलए कायद्याखाली 26 जून रोजी अटक केली होती. ईडीने आणखी सात दिवस कोठडी मिळावी, असं उच्च न्यायालयात सांगितलं होतं. न्यायालयाने 6 जुलैपर्यंत कोठडी वाढवून दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

तुमचं सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये आग लावत असेल तर…- जयंत पाटील

ठाकरे सरकार पाडण्याचा नाही तर आम्ही दुसराच प्लॅन आखतोय, दानवेंनी भाजपचं सिक्रेट फोडलं!

‘मी आपणासही विनंती करु इच्छितो की…’; उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना रोखठोक उत्तर

फिल्मी स्टाईलने पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या; आरोपीला पकडण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

फडणवीस, अमित शहांची गुप्त बैठक, नंतर मोदींशी चर्चा, ठाकरे सरकारवर अस्थिरतेचं ढग?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More