बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या ‘या’ लुकने चाहते घायाळ, पाहा फोटो

मुंबई | ‘देसी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूडची अभिनेत्री प्रियंका चोप्रा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सतत चर्चेत असते. कधी तिच्या ड्रेसमुळे तर कधी तिच्या अभिनयामुळे, अशाचप्रकारे ती पुन्हा एकदा आपल्या अनोख्या लुकमुळे सोशल माध्यमांवर चर्चेत आली आहे.

Photo Credit- Instagram/priyankachopra

प्रियंकाने तिच्या अभिनयानाने  केवळ भारतातच नाही, तर तिने हॉलिवूडमध्येही आपलं नाव कमवलं आहे. तसेच ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्हही असते. ती तिच्या चाहत्यांसोबत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सुरू असलेल्या घडामोडींचीही माहिती देत असते.

Photo Credit- Instagram/priyankachopra

अशातच प्रियंका ऑस्ट्रेलियाच्या एका मॅगझिनच्या पहिल्या पानावर झळकली आहे. तिने नुकतंच ऑस्ट्रेलियाच्या ‘वूग मॅगझिन’ नावाच्या मॅगझिनसाठी फोटोशूट केलं आहे. त्यातील काही फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून फोटो शेअर केले असून, ती या फोटोंमध्ये हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

Photo Credit- Instagram/priyankachopra

प्रियंकाच्या या फोटोमधील ग्लॅमरस अंदाज पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. त्याचबरोबर एका फोटोमध्ये प्रियंकाने पांढऱ्या रंगाचा स्लिवलेस गाऊन घातला असून, त्याला काळ्या रंगाच्या पट्ट्या असल्याचंही दिसून येतं आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये प्रियंकाने काळ्या रंगाची स्पेगटी घातली असून, खालीही काळ्या रंगाची  पॅन्ट घातली आहे. या ड्रेसमध्ये ती एकदम बॉल्ड दिसत आहे. त्याचप्रमाणे तिने त्या फोटोंमध्ये ज्या पद्धतीने पोज दिल्या आहेत, त्यामुळे आणखीनच ते फोटो अजूनच खुलून आले आहेत.

Photo Credit-Instagram/priyankachopra

थोडक्यात बातम्या-

“प्रियांका, कंगणाला भेटणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान”

पुणे हादरलं! फुरसुंगीत कॅनॉलमध्ये एकामागोमाग एक मृतदेह आले वाहत

“बाबा माझे कपडे फाटलेत…”,बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी दीड वर्षांनंतर परिवाराला भेटली

“भाजपने ॲापरेशन लोटसचा कधीच दावा केला नाही, तरी एवढी धास्ती का?”

12 नावांची यादी खरंच भूतांनी पळवली?, राज्यपाल कार्यालयाचं तात्काळ स्पष्टीकरण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More