बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देसी जुगाड! वाफ घेण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर आपल्याला रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात. अशा व्हिडीओला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळत असते. काही व्हिडीओंना पाहून आपण अवाक् होऊन जातो. सध्या असाच एक भन्नाट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सध्या कोरोनाच्या परिस्थितीत काळजी घेण्यासाठी अनेक वेगवेगळे नुस्के वापरले जात असलेले पाहायला मिळतात. यातच कोरोनापासून बचाव करण्यासाठी घशात होणारी खवखव थांबवण्यासाठी, सर्दी-ताप बरा होण्यासाठी डाॅक्टर आपल्याला वाफ घेण्यास सांगत असतात. मात्र अनेकांकडे वाफ घेण्याची साधनं नसतात. त्यामुळं ते वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून वाफ घेत असतात. अशातच व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तरुणानं वाफ घेण्यासाठी देसी जुगाड केल्याचं दिसून येत आहे.

ग्रामीण भागात वीज आणि स्टिमर नसल्यानं अधिकाधिक लोक देसी जुगाड करुन वाफ घेत आहेत. सध्या व्हिडीओमध्ये एक तरुण देसी जुगाड करत असल्याचे दिसून येत आहे. तुम्ही पाहू शकता तो प्रेशर कुकरचा वापर करुन वाफ घेत आहे. कुकरची शिटी 90 डिग्री असलेल्या पाइपमध्ये बदलण्यात आली आहे. तर बाजूस वाफ घेण्यासाठी शॉवरचे टोक लावल्याचे दिसून येत आहे. यामुळे तो अगदी सहज वाफ घेऊ शकत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! लाॅकडाऊनचा नियम मोडल्यानं पोलिसांनी मुलाच्या हाता-पायावर ठोकले खिळे?

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

“म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात नाहीत, राज्यसरकारची घोषणा फसवी”

“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो”

डाॅक्टर होऊ घातलेल्या ऊसतोड कामगाराच्या मुलाची कोरोनाशी झुंज अपयशी; मित्रांनी उपचारासाठी जमवले होते पैसे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More