सपना चौधरीच्या नव्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ
नवी दिल्ली | हरियाणाची सपना चौधरी ही काही वर्षापुर्वी देशभरात फेमस झाली. तिच्या गाण्यानं आणि ठुमक्यांनी प्रेक्षकांचं मन जिकलं होतं. सपनाचं नवीन गाणं ‘पायल चांदी की’ रिलिज झालं आहे. तिच्या बाकीच्या गाण्यांप्रमाणे हे गाणं देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं , आणि सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झालं आहे.
सपनाच्या नृत्यानं सगळेच घायाळ झाले आहेत. सपनाने तिच्या इन्सटाग्राम अकाऊंटवरही हे गाणं शेअर केलं आहे. ‘पायल चांदी की’ या गाण्यात सपना पारंपारिक वेशभूषेत दिसली आहे. या पोषाखात ती अतिशय सुंदर दिसत आहे. हे गाणं मुकेश यांनी लिहलं असून या गाण्याला संगीत रांझा यांनी दिलं आहे. या गाण्याला आवाज हरियाणाच्या प्रसिद्ध गायिका रेणूका पवार यांनी दिला आहे.
यापूर्वी सपना चौधरी यांच आंतरराष्ट्रीय महिला दिनाला ‘गुंडी’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. 8 मार्चला खास महिलांसाठी हे गाणं रिलीज केल्याचं सपनाने सांगितलं आहे. त्यावेळीही या गाण्याची प्रसारमाध्यमांमध्ये बरीच चर्चा रंगली होती.
सपना चौधरी हरियाणवी संगीत क्षेत्रात बरीच प्रसिद्ध झाली आहे. तसेच बिग बाॅस मध्येही तिने काम केलं आहे. बिग बाॅस मध्ये ती चांगलीच गाजली होती. या कार्यक्रमानंतर प्रत्येक घराघरात सपना पोहोचली.
थोडक्यात बातम्या –
पवारसाहेब जाणते राजे, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवा- प्रसाद लाड
सचिन वाझेंची प्रकृती खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खलबतं; ‘या’ बड्या नेत्याचं मंत्रिपद जाणार?
प्री-माॅन्सून सिझनला सुरवात; ‘या’ राज्यात पावसाची शक्यता
महापौर निवडणुकीआधीच जळगाव महानगरपालिकेमध्ये राजकीय भूकंप?
Comments are closed.