मुंबई | महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वांना खाते वाटपाची प्रतिक्षा आहे. जनतेसोबतच आमदारांना देखील मंत्रीमंडळात कोणाकोणाला घेणार, याची उत्सुक्ता लागली आहे. त्यामुळे आता खाते वाटप केव्हा होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
शिवसेनेचे बंडखोर आमदार विजय शिवतारे हे शिवसेनेसोबत बंड करुन शिंदे गटात सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी आम्ही सत्तेसाठी बंड केले नाही, असे सर्व बंडखोर आमदार म्हणत होते. पण आता त्यांना मंत्र्याच्या खुर्चीची आस लागली आहे. त्यांच्या मनातील ईच्छा आता हळूहळू बाहेर येत आहेत. प्रहार पक्षाचे बच्चु कडू आणि आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार हे कॅबिनेट मंत्रीपदासाठी वशिले लावत असल्याची माहिती मिळते आहे.
शिवसेनेचे माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही मंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. मला मंत्रीपद मिळालं तर मी त्याला शंभर टक्के न्याय देईन, जनतेची कामे करीन असं म्हंटलं आहे. मंत्रीपद नाही तर निदान आपल्याला मुख्यमंत्री शिंदे विधान परिषदेवर तरी घेतील अशी त्यांना आशा आहे. शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नव्हता अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे 40 + 10 अपक्ष आमदार सध्या भाजपसोबत आघाडीत आहेत. दोनही पक्षात मंत्री होण्यासाठी आमदार उत्सुक आहेत. स्वपक्षीयांनी नाराज न करता शिंदे गटाला जास्त मंत्रीपदे देण्याचं आव्हान सध्या भाजपसमोर आहे. त्यामुळेच सरकारकडून खातेवाटप लांबवलं जाते आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
थोडक्यात बातम्या –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
शिवसेना आक्रमक; आणखी एका नेत्याची पक्षातून केली हकालपट्टी
शिंदे सरकारच्या खातेवाटपाबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…
‘मिस इंडिया 2022’ ठरलेल्या सिनी शेट्टीबद्दल जाणून घ्या सर्व काही
पावसाळ्यात ‘या’ सोप्या घरगुती उपायांसोबत घ्या तुमच्या त्वेचेची काळजी
Comments are closed.