बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मृत्यूनंतर माझ्या अस्थी बिअरमधून पबबाहेरील नाल्यात विसर्जित करा”

इंग्लंड | यूकेमधील एका माणसाने एक अजब इच्छा व्यक्त केली होती. आवडत्या पबबाहेरील नाल्यात मृत्यूनंतर आपली अस्थी विसर्जित करा, असं या माणसाने म्हटलं होतं. ही इच्छा त्याच्या कुटुंबीयांनी पूर्णही केली.

केविन मॅकग्लिन्शे नावाच्या व्यक्तीने मृत्यू होण्यापूर्वी आपल्या कुटुंबाला विनंती केली होती, की त्याच्या अस्थी पबच्या बाहेर विसर्जित व्हाव्यात. त्यांच्या मुलाने आणि मुलीने त्यांच्या मृत्यूनंतर ही इच्छा पूर्ण केली आहे. त्यांनी वडिलांच्या अस्थीची राख बियरमध्ये ओतली आणि नंतर ते पबच्या बाहेर असलेल्या नाल्यात ओतले.

माझ्या वडिलांना पब खूप आवडायचे, ते दररोज इथे यायचे. ते नेहमी म्हणायचे, माझ्या अस्थी पबच्या बाहेरील नाल्यात विसर्जित करा, म्हणजे मी मेल्यावरसुद्धा माझ्या प्रिय लोकांना भेटू शकेन. जेव्हा जेव्हा लोक इथून जातील तेव्हा ते माझी आठवण काढतील, असं केविन मॅकग्लिन्शच्या मुलीने सांगितलं.

कोणालाही हा वेडसरपणा वाटेल, पण ही आमच्या वडिलांची शेवटची इच्छा होती. आपल्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केल्यामुळे तिला खूप आनंद झाला आहे, असंही केविन मॅकग्लिन्शच्या मुलीने म्हटलंय.

थोडक्यात बातम्या

लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी कायपण… ‘या’ भागात सुरु आहे अत्यंत धक्कादायक प्रकार

गॅस, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली ‘चूल मांडा’ आंदोलन करणार

मोठी बातमी! खासगी रुग्णालयांमध्ये ‘इतक्या’ रुपयांत मिळेल कोरोनावरील लस

मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत संजय राऊतांचा गौप्यस्फोट, म्हणाले..

…म्हणून उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली; मनसेनं सांगितली अंदर की बात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More