मुंबई | अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळं अडचणीत आली आहे. राखीनं तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खानवर(Adil Khan) गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी आदिल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
आदिल सध्या कोठडीत असला तरी राखी त्याच्याबद्दल नवनवीन खुलासे करत आहे. काही दिवसांपूर्वी राखीनं आदिलवर तिचे न्यूड व्हिडीओ विकल्याचा आरोप केला होता. यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
राखी- आदिल प्रकरण चर्चेत असतानाच एका इराणी मुलीनेही आदिलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या इराणी मुलीने सांगितल्याप्रमाणे आदिलनं तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता.
आता राखीची मैत्रीण म्हणजेच शर्लिननेसुद्धा आदिलवर टीका केली आहे. एका व्हायरल व्हिडीओत असं दिसत आहे की, राखी आणि शर्लीन सोबत आहेत. यावेळी शर्लिन म्हणत आहे की, राखीच्या मनात तुझ्याबद्दल एवढं प्रेम आहे की तू राखीसाठी काहीही करायला पाहीजे होतं. आदिल तू माझा बूट पाहिलाय का?, असंही शर्लिन म्हणते. त्यावर राखी म्हणते हे सगळं खरं आहे. पण शेवटी मी प्रेम केलं आहे.
दरम्यान, राखी आणि आदिल लवकरच घटस्फोट घेऊ शकतात, अशा चर्चा आहेत. त्यामुळं राखीचं दुसरं लग्नही फार काळ टीकू शकलं नाही, असं म्हणायला काही हरकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
- मोठी बातमी! चिंचवड पोटनिवडणुकीत आणखी एक मोठा ट्विस्ट
- अरे वाह! तुमचे केस तुम्हाला महिन्याला 25,000 रुपये कमवून देऊ शकतात
- चेकअप करणाऱ्या नर्सला पाहून लहान मुलाने दिली Cute Reaction ; व्हिडीओ होतोय व्हायरल
- “…तर त्यांना सरळ करू आणि ठोकून काढू”
- उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायची घाई केली नाहीतर…,छगन भुजबळांचा मोठा दावा