…नाहीतर पात्र असूनही ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा हफ्ता

नवी दिल्ली | केंद्राच्या(Central Goverment) पीएम किसान योजनेद्वारे(PM Kisan Yojana) पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन महिन्यांतून एकदा 2 हजार रूपयांची आर्थिक मदत मिळते. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या या रक्कमेला शेतकऱ्यांच्या सन्मानाची रक्कम देखील म्हणतात. या योजनेचे आतापर्यंत 12 हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

या योजनेचा 13 वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. साधारण डिसेंबरच्या अखेरीस हा हफ्ता जमा होऊ शकतो. परंतु या योजनेचा लाभ घेत असलेल्या काही शेतकऱ्यांचं नाव 13 व्या हफ्त्यासाठी वगळले जाऊ शकते.

या योजनेच्या फायदा घेण्यासाठी पात्रता ठरविण्यात आली आहे. परंतु अनेक शेतकरी या योजनेसाठी अपात्र असूनही फायदा घेत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या तक्रारीनंतर शासनाकडून जमीनीच्या नोदींची तसेच सामाजिक पडताळणी करण्यात आली.

या पडताळणीनंतर असं लक्षात आलं की, लाखो लोक पात्र नसताना या योजनेचा फायदा घेत आहेत. उत्तर प्रदेशातील तर 21 लाख शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. त्यामुळं या शेतकऱ्यांना 13 व्या हफ्त्याचा लाभ मिळणार नाही.

आता अशा अपात्र शेतकऱ्यांना वसुलीसाठी नोटीस पाठविल्या जात आहेत. नोटीसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता पर्यंत मिळालेली रक्कम परत करण्यास सांगितले आहे. तसेच पैसे परत न केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

तसेच काही शेतकरी पात्र असूनही जर त्यांनी ई-केवायसी केलं नसेल तर त्यांनाही हा हफ्ता मिळणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More