बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जखमी असतानाही कोलकाताचा ‘हा’ खेळाडू खेळला प्लेऑफचे सामने

मुंबई | कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये पराभव पत्कारावा लागला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून दिनेश कार्तिक चांगली मेहनत घेतली आहे. कोलकाता नाईट रायडर्सला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठी दिनेश कार्तिकची मोलाची भूमिका होती. आता दिनेशच्या आयपीएलमध्ये खेळण्यावरून मोठा खुलासा करण्यात आलेला आहे.

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आणि कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार दिनेश कार्तिक प्लेऑफच्या सामन्यामध्ये इंजेक्शन घेऊन खेळला, अशी माहिती समोर आली आहे. तामिळनाडू क्रिकेट असोशिएसन्सचे सचिव एस रामास्वामी यांनी दिनेशच्या इंजेक्शन बाबतीचा खुलासा केलेला आहे.

दिनेश कार्तिक हा मागील काही दिवसांपासून गुडघ्याला दुखापत झाली होती. म्हणून त्याला पेनकिलरचे इंजेक्शन घ्यावं लागलं होतं. आपल्या दुखापतीमुळं आता दिनेश कार्तिक आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक सामन्यांना मुकणार आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक सामन्यात दिनेश कार्तिक तामिळनाडूचं प्रतिनिधित्व करतो.

दरम्यान, रामास्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजेक्शन घेतल्यानंतर दिनेश कार्तिक आयपीएल प्लेऑफ मध्ये खेळला. म्हणून आता आम्ही सय्यद मुश्ताक करंडकासाठी विश्रांती देण्यात आलेली आहे. त्याच्या जागी विजय शंकर तामिळनाडू संघाचं नेतृत्व करणार आहे.

थोडक्यात बातम्या –

‘रूपाली चाकणकरांनी महिलांसाठी केलं तरी काय?’; शालिनी ठाकरेंचा हल्लाबोल

डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; जाणून घ्या नेमकं काय आहे ‘TRUTH SOCIAL’

“मंत्रालय बंद असताना शरद पवारांच्या शागिर्दांनी 15 हजार कोटी लुटले”

मॅंचेस्टर युनायटेडची आयपीएलमध्ये एन्ट्री; ‘हा’ संघ विकत घेण्याची शक्यता

‘मालदीव आणि दुबईमध्ये त्यांची…’; नवाब मलिकांचे समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More