बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वत: गर्भवती असूनही 9 महिने केली रुग्णांची सेवा, प्रसुतीवेळी कोरोनाने नर्सचा मृत्यू आणि….

रायपूर | ह्रदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. कोरोना काळातही रुग्णांची सेवा करत राहिलेल्या एका गर्भवती नर्सचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सुदैवानं बाळाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं मात्र ते आईला वाचवू शकले नाहीत. छत्तीसगडच्या कवर्धा ब्लॉकमधील लिमो गावात ही घटना घडली आहे.

प्रभा गर्भवती असूनही कोविड वॉर्डमध्ये ड्युटी करत राहिली. ती कवर्धा ब्लॉकच्या ग्रामीण लिमो येथे राहत होती, तर तिची पोस्टिंग प्राथमिक आरोग्य केंद्र खैरवार खुर्द लोरमी येथे होती. गरोदरपणासाठी ती कपडाह या गावी भाड्याच्या खोलीत एकटीच राहत होती, असं पती भेष कुमार बंजारे यांनी सांगितलं.

प्रभाला बर्‍याच वेळा सुटी घेण्यास सांगितलं पण ती तयार नव्हती. ती म्हणायची मी घरात बसून काय करणार? त्यापेक्षा मी काम करत राहिलेलं चांगलं आहे. तिनं गरोदरपणातही संपूर्ण 9 महिने रुग्णालयात काम केलं, असंही भेष कुमार बंजारे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, प्रसुती वेदना सुरू झाल्यानंतर प्रभाला 30 एप्रिल रोजी कवर्धा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सिझेरियन ऑपरेशनद्वारे तिनं एका मुलीला जन्म दिला. रुग्णालयात असताना तिला बर्‍याच वेळा ताप आला होता. त्यानंतर तिला कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. यानंतर ऑक्सिजनची पातळी कमी होत गेल्यानं तिला रायपूरला हलवण्यात आलं. मात्र 21 मे रोजी तिचा मृत्यू झाला.

थोडक्यात बातम्या- 

“असं ऐकलंय की ट्विटरच्या चिमणीने 56 इंची पोपटाची हवा काढली”

ठाकरे सरकारचा मोठा आणि महत्वाचा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

‘या’ ठिकाणी सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू मिळाल्यानं भीतीचं वातावरण!

सावधान! कोरोनानंतर लहान मुलांना ‘या’ आजाराचा धोका

पुण्यातील लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More