अनिल देशमुखांच्या जामीनाबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना(Anil Deshmukh) मुंबई उच्च न्यायालयाकडून(Mumbai High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयानं देशमुखांचा जामीन मंजूर केला आहे. एक लाखांच्या जातमुचलक्यावर देशमुखांना जामीन मिळाला आहे.
देशमुखांचा तब्बल 13 महिन्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. ही माहिती समोर येताच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे(NCP) कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयानं देशमुखांचा जामीन नाकारला होता. त्यानंतर देशमुखांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या सोमवारच्या सुनावणीत देशमुखांचा जामीन काही अटींसह मंजूर करण्यात आला.
न्यायालयानं जामीन मंजूर करताना घातलेल्या अटी अशा आहेत की, देशमुखांना आठवड्यातून दोनदा ईडी(ED) कार्यलयात हजर रहावे लागणार आहे. तसेच त्यांचा पासपोर्ट तपास यंत्रणाकडं जमा करावा लागणार आहे. देशमुखांना तपास यंत्रणांच्या परवानगिशिवाय देश सोडून जाता येणार नाही.
मात्र देशमुखांना कोर्टाचा दिलासा मिळाल्यानंतर सीबीआयनं(CBI) सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) धाव घेतली आहे. यासाठी सीबीआयनं 10 दिवसांचा वेळ मागितला आहे. सीबीआयची ही मागणी उच्च न्यायलयानं मान्य केल्यानंतर देशमुखांच्या जामीनाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळं आणखी 10 दिवस देशमुखांना तुरुंगातच रहावं लागणार आहे.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. या पत्राद्वारे त्यांनी देशमुखांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप केले होते.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.