बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वत:चा अपघात होऊनही रविकांत तुपकरांनी जखमींना केली मदत

बुलडाणा | स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. बुलडाण्याहून मुंबईकडे जात असताना तुपकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. एका दुचाकीने येऊन तुपकरांच्या चारचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी आहेत. रविकांत तुपकर या अपघातातुन थोडक्यात बचावले आहेत. विशेष म्हणजे तुपकर यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

तुपकर हे रात्री 9 च्या आसपास मुंबईला निघाले होते. तेव्हा चिखलीजवळच्या बेराळा फाट्याजवळ अचानक एक दुचाकी येऊन धडकली. दुचाकीचा वेग जास्त असल्याने दुचाकीवरील तरुण थेट तुपकरांच्या गाडीला जाऊन धडकले. तर तुपकरांच्या गाडीचाही वेग जास्त असल्याने ड्रायव्हरलाही गाडीवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि अपघात घडला. अपघातात दुचाकीस्वारांना बराच मार लागला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अपघातामध्ये तुपकर आणि त्यांच्यासोबत गाडीत असलेल्या ड्रायव्हरला फारसा मार लागला नाही. मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यावेळी स्वत: तुपकरांनी जखमींना रुग्णालयात नेलं. तुपकर मुंबईला उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटायला चालले होते. तेव्हा हा अपघात घडला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकरांनी आंदोलन केलं होतं. त्यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलावलं होतं.

मागील 4 दिवसांपासून तुपकर कापूस आणि सोयाबीनला भाव मिळावा या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करत होते. त्यानंतर तुपकरांची तब्येत अधिक बिघडली होती. त्यामुळे आंदोलनातील कार्यकर्त्यांनी आक्रमक होत रास्ता रोको देखील केला होता. एका कार्यकर्त्याने तर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसने आपल्या ‘त्या’ विधान परिषद उमेदवारांची नावं केली जाहीर

“गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही, मी आमदार असताना…”

“आर्यन खानने जे काही भोगलं त्याची भरपाई कोण देणार?”

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान

प्रियांका चोप्रानं नावात केला मोठा बदल, धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More