रशियाच्या धमकीला न जुमानता अमेरिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
नवी दिल्ली | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) सुरूवात होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. युक्रेनमधील (Ukraine) परिस्थिती भयावह असताना रशियाने (Russia) युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. या युद्धादरम्यान अमेरिका युक्रेनला सर्वात जास्त मदत करताना दिसत आहे.
कोणत्याचं देशाने युक्रेनला मदत करू नये, असं रशियाने सर्व देशांना बजावलं होतं. जर कोणत्या देशाने युक्रेनला मदत केली तर त्यांना ते महागात पडेल, असा इशाराही रशियाने दिला होता. मात्र, रशियाच्या कोणत्याही धमकीला न जुमानता अमेरिका (USA) युक्रेनला मोठ्या प्रमाणात मदत करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने युक्रेनसाठी नवीन लष्करी मदत आणि राजनैतिक समर्थनाची घोषणा केली आहे. अमरिकेने $165 दशलक्ष किमतीच्या दारूगोळा विक्रीला मान्यता दिली आहे. तर अमेरिकेने युक्रेनला $700 दशलक्ष अतिरिक्त युद्धसामग्री मदत म्हणून देण्याचे वचन दिले आहे.
दरम्यान, आम्हाला रशियाला कमकुवत बनवायचं आहे जेणेकरून ते युक्रेनवर हल्ला करू शकणार नाहीत. आणि युक्रेनला योग्य शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला तर युक्रेन रशियाला पराभूत करेल, असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
एलॉन मस्क यांनी तब्बल ‘इतके’ पैसे मोजत खरेदी केलं ट्विटर
मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत नितेश राणेंनी दिलं थेट आव्हान, म्हणाले…
“सोनिया गांधींसमोर झुकताय म्हणून तर मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास होतोय”
“अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाच्या”
Comments are closed.