बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एक, दोन नाही तर तब्बल तीन शतके ठोकूनही ‘या’ स्फोटक खेळाडूला संघात स्थान नाही!

मुंबई | आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 च्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक देश आपापल्या क्रिकेट संघाची बांधणी करताना दिसत आहे. अशातच विश्वचषकासाठी न्युझीलंडने संघ जाहीर केला आहे. यामध्ये धडाकेबाज सलामीवीर फलंदाज काॅलिन मुनरोला न्युझीलंड संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये काॅलिन मुनरोने दमदार फलंदाजी करत 3 शतकांसह 1 हजार 724 धावा केल्या आहेत. त्याने आयपीएल, पीसीएल, केपीएल, तसेच बिग बॅंश लीगमध्येही चांगली खेळी केली आहे. टी-20 विश्वचषकासाठी त्याची संघात निवड न केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मला संघात स्थान न मिळाल्याने मी निराश आहे. टी-20 विश्वचषकामध्ये स्थान मिळवणं माझं ध्येय होतं. मात्र आता असं वाटतंय की, मी संघाकडून शेवटचाच सामना खेळून आलो आहे, असं मुनरोने इंस्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. मुनरोने न्युझीलंड संघाकडून फेब्रुवारी 2020 ला शेवटचा आंतरराष्टीय सामना खेळला होता.

दरम्यान, यंदा भारतात टी-20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात आलं होतं. परंतु कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे ही स्पर्धा 17 ऑक्टोबर पासुुन युएईमध्ये घेण्याचा निर्णय आयसीसीकडून घेण्यात आला. तर या स्पर्धेचे सगळे अधिकार भारतीय क्रिकेट मंडळाकडे राहणार आहेत. त्याचबरोबर आयसीसी टी-20 विश्वचषकचा 2021 चा शेवटचा सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येईल असे आयसीसीने स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘भाजपचं मराठा आरक्षणावरील प्रेम पुतण्या मावशीसारखं’; शिवसेनेचा भाजपला टोला

“ठाकरेंचं मला सांगू नका माझा मुलगा पालिकेच्या शाळेत शिकत आहे”

“मंत्रालयातील सर्व बाटल्या संजय राऊतांनीच मोकळ्या केल्या, त्यामुळे…”; निलेश राणेंची जहरी टीका

“ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावं स्टेडियमला दिली जाताहेत”

“आम्ही तलवार, बंदुका घेऊन लढणारे, आज मराठा रस्त्यावर आंदोलन करतोय हे देशाचं दुर्देव”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More