बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यात इतक्या घटना घडतात तरीही सरकार षंढासारखं बसलंय”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आता आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने महिला सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात निर्देश दिले होते. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेऐवजी अत्याचाराची तिसरी लाट येतीय का काय, असं आता वाटू लागलंय. या संदर्भात भाजपने राज्यपालांकडे विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं पत्र हे दुर्देवी असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री स्वत:चा कुटुंबप्रमुख असा उल्लेख करतात. मात्र, त्यांच्या नाकाखाली अशा घटना घडतात. विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली तर त्यात गैर काय? तुम्ही राज्यपालांना विरोधकांचं थोबाड फोडायला सांगता. सरकारचं थोबाड फोडा. आहे का तुमच्या हिंमत? राज्यात इतक्या घटना होत असताना राज्यातील सरकार षंढासारखं बसलंय, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यात इतक्या घडत असताना देखील सर्वज्ञानी म्हणात, असं काय राज्यात घडतंय अधिवेशन घेयला. आमचं सरकार पाच वर्ष टिकेल असं सांगून तुमच्या तोंडाला फेस येतोय, अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘हे’ लक्षण आढळलं की कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येते- उदयनराजे भोसले

दीपक हुड्डाला मोठा धक्का; बीसीसीआय करणार हुड्डाची चौकशी!

“ही तर राज्य सरकारची अपरिपक्वता, राज्यपालांना पत्र पाठवताना खातरजमा केली पाहिजे होती”

Amazon ने केंद्र सरकारला 8,546 कोटींची लाच दिली”

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास केंद्र सरकार करणार ‘इतक्या’ हजारांची मदत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More